The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर वचक

राज्यभरातील खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी बिलांना चाप लावण्यासाठी उपचारांचे व सेवांचे दर मराठी व इंग्रजी भाषेत रुग्णालयात दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे सक्तीचे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

​या नियमानुसार आता राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना त्यांच्या विविध उपचारांचे, बेडचे, तपासण्यांचे आणि इतर वैद्यकीय सेवांचे दर स्पष्टपणे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये रुग्णालयाच्या रिसेप्शन किंवा इतर दर्शनी भागात (प्रसिद्ध ठिकाणी) लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे, जेणेकरून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उपचारांचा खर्च आधीच समजू शकेल.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts