The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

संपादकीय : गुन्हा दाखल नसताना सीडीआर काढलाच कसा जातो ?

आम्ही अनेकदा जे प्रेडिक्शन करतो ते सत्य होते, नासिकमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर धंदे नियमबाह्य कामे लाचखोरी, नाशिकची सामाजिक स्थिती बिगडत चालल्याचे आणि त्याच अनुषंगाने तरुणांमध्ये नैरास्य व्यसनाधीनता व गुन्हेगारी वृत्ती वाढीस चालल्यासंदर्भात आमच्या दि. सेपिअन्स  वृत्तपत्रात आम्ही “उडता नासिक” हा लेख काही वर्षापूर्वी प्रकाशित केला होता. त्याचाच प्रत्येक पुढे जाऊन आला आज नाशिक शहर पोलिसांनी अतिशय परिणामकारक कृती करून या गुन्हेगारीला कुठेतरी आळा घालण्याचा जो प्रयत्न केला आहे तो जरी अभिनंदनिय असला तरी देखील काही राजकीय वरदहस्थामुळे व पालकांच्या दुर्लक्षामुळे याचा यथोचित परिणाम होण्यास काही काळ तरी जाईल.
परंतु आज विषय हा नाही आम्ही आज आणखी एक प्रेडिक्शन करीत आहोत जे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून ते प्रकरण आहे गुन्हा दाखल नसतानाही कुणाचे कॉल डिटेल्स व सीडीआर काढणे. जो अतिशय गंभीर प्रकार असून यंत्रणांच्या माध्यमातूनच होण्याची शक्यता अधिक आहे किंवा होत असू शकतो ही केवळ शंका नसून यासंदर्भात आत्ताच पत्नीच्या आत्महत्येत अटक झालेल्या एका लिपिकाने पत्नीचा सीडीआर कसा मिळवला हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. गुन्हा न दाखल होता त्याने तो सीडीआर मिळवला असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि असे किती सीडीआर गुन्हा दाखल न होता काढण्यात आले याचा शोध घ्यावा. आमच्या सूत्रांकडून कळाले की असाच अनुचित परंतु यशस्वी प्रयत्न एका अधिकाऱ्याने देखील केला होता. जो पूर्णपणे नियमबाह्य आहे. याची सखोल माहिती मिळताच व सत्यता पडताळून आम्ही संबंधित अधिकाऱ्याचे नाव देखील प्रसिद्ध करण्याचा मानस आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts