पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची तारीख बदलण्यात आली आहे. आता ८ जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार नाहीत.
निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 293 जागा मिळाल्या. नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड झाली. सर्व घटक पक्षांनी पाठिंब्याची पत्रे सादर केली आहेत. आता मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तारखेबाबत साशंकता आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची तारीख बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता मोदी तिसऱ्यांदा 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. यापूर्वी हा कार्यक्रम ८ जून रोजी होणार होता. मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यात परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.