The Sapiens News

The Sapiens News

पंचरवाला तो ही आपल्या door step पर्यंत

तुम्ही गाडी पंचर झाली की पंचरच्या दुकानापर्यंत ती ढकलत नेणारी मंडळी अनेकदा पाहिली असे आणि हा प्रसंग अनेकदा आपल्याही वाट्याला आलाच असेल. अतिशय जिकिरीची कष्टाची आणि तेवढीच कटकटीचे ही समस्या दूर करण्याचे व लोकांच्या गरजेनुसार आपल्या व्यवस्यात परिवर्तन व सुधारणा करीत अधिक चांगली व पंचर झाल्याच्या जागेवरच सुविधा देण्याची शक्कल लढवली आहे. नाशिकच्या सलीम पठाण या पंचर काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने. तुम्ही नाशिक शहरात कुठेही असा, आहे त्या जागेवर येऊन सलीम हे पंचर काढून तुमचा गाडी पंचर झाल्यानंतरच त्रागा क्षणात दूर करतात.
यासाठी त्यांनी एका जुन्या रिक्षात (AUTO) पंचर काढण्याचा पूर्ण स्टेटअप बसवला असून अगदी पाणी हवा भरण्याचे मशीन व hot प्रेस ही त्यात आहे. आहे ना नाविन्यपूर्ण idea ? यालाच म्हणतात लोकाभिमुख व्यवसाय. ज्याला काम करायचे त्याला कामाची कमी नाही. फक्त एक छान कल्पक डोकं हवं. जे सलीम यांना आहे तुम्हाला ही गाडी पंचर झाल्याच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली तर call करा सलीमला या नंबर वर 9763786096 गाडी ढकलण्याची वेळ यायची नाही.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts