काही महिन्यांपूर्वी मी एका शाळेत चीफ गेस्ट म्हणून त्यांच्या स्पोर्ट्स डे ला गेलेलो. तर तेथील प्रिन्सिपल ज्या माझ्या अतिशय छान परिचयाच्या आहेत. त्यांनी असेच इकॉनोमिकल डिस्कशनमध्ये सांगितले “चांदी लेके रखो चांदी बहुत बढने वाली हे” आज चांदी काय वाढली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रश्न हा नाही की चांदी वाढली सोनं वाढलं प्रश्न हा आहे की ज्याने हे प्रेडिक्शन केलं होतं त्याने ते घेतलं का ? अर्थात नाही ज्या मॅडमनी हे प्रेडिक्शन केलं होतं त्या मॅडमनी चांदी घेतली नाही आणि त्याचं मूळ कारण त्या आर्थिक दृष्टिकोनातून तेवढ्या संपन्न नव्हत्या. त्यांच्या PhD ची फी भरण्याकरता देखील मी त्यांना आर्थिक मदत केलेली. अगदी पीएचडी करणाऱ्या व्यक्तीकडे फीज भरण्याचे पैसे नव्हते. परंतु त्याला आर्थिक दृष्टिकोनातील अस्खलित ज्ञान होते. तुम्ही उच्चशिक्षित असाल तुमच्याकडे ज्ञान असेल याचा अर्थ तुम्ही संपन्न असालच असे नाही. ज्ञान तेच खरे जे आपल्याला संपन्न करू शकेन. केवळ विचारानेच नाही तर अर्थजांनाने देखील. कारण केवळ ज्ञान पोट भरू शकत नाही. knowledge n implementation यांची सांगड घालणं खूप आवश्यक असते आणि त्यासाठी खिशात काही असायला हवं आणि नसेलच तर सर्वप्रथम ते मिळविण्याच ज्ञान हव केवळ पुस्तकी ज्ञान ना पोटाची खळगी भरू शकते ना भविष्य सुधारू शकते. दुर्दैव हे आहे की आपल्या शिक्षण संस्थांना अजून हेच उमजलं नाही की ज्ञानाच्या कक्षा चार भिंतीत बांधल्या जाऊ शकत नाही आणि जर तुम्ही तो बांधण्याचा प्रयत्न करत असाल तर बेकारांची एक मोठी फौज तयार कराल जी एक दिवस तुम्हाला देखील खाईन आणि असेही विद्वानांना मोठमोठ्या पीएचडी धारकांना अंगठा छाप राजकीय नेते असलेले शिक्षण सम्राट खाताच की. आपल्या शिक्षकांना आणि आपल्या शिक्षण संस्थांना अजून हेच उमजले नाही की सिस्टीम कशी चालते…. आणि हे त्यांच्याच बरोबर या समाजाचे ही दुर्दैव आहे…..आजची शिक्षण व्यवस्था ही डॉक्टरेट तर देते परंतु पेशंट मात्र उपलब्ध होत नाही.





