The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

कृपया नापास झालेल्यांना डिवचू नका उद्या तेच तुमचे….

10 वी झालेल्या सर्व विद्यार्थांचे मनस्वी अभिनंदन आणि जे नापास झाले. त्यांचे अधिक अभिनंदन कृपया ही गंमत नाही. नापास मुलांचे अभिनंदन यासाठी की प्रत्येक व्यक्तीला जीवनात काहीतरी उदात्त करण्यासाठी एक झटका, खुन्नस, आग, स्फोटक मनात असणे व लागणे अतिशय असते आणि ते जेवढ्या लहान वयात लागेल तेवढी  व्यक्तीची प्रगती अधिक हा माझा  विश्वासच नाही स्वानुभव आहे. जेव्हा जग तुमचा अपमान करते तुमच्या अस्तित्वाला आव्हान देते तुम्हाला तुच्छतेने वागवते. त्यावेळेसच तुम्ही काहीतरी उदात्त करण्याची दाट शक्यता असते. मी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की जीवनात त्या कागदाच्या तुकड्याचे खूप महत्त्व नाही. पुढच्या 2/4 वर्षातच तुमची टक्के देखील तुम्हाला कुणाला लक्षात राहणार नाही. परंतु समाजाने दिलेल्या नापास मुलांना जखमा आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतील. मी सर्व नापास मुलांना एक मनापासून निवेदन करतो ही आग तो अपमान विझू देऊ नका आणि त्याच्याने स्वतःच्या जीवनाला किंवा मनाला जाळू देखील नका ती आग जपून ठेवा ठासून भरा आणि त्यावरच तुमचं अन्न शिजवा ते अन्न एवढं शिजवा की समाजातील दीनदुबळ्या गरीब लोकांचे देखील पोट भरेल आणि ही क्षमता तुम्हाला ती आगच देईन तिचा फक्त सकारात्मक उपयोग करा काहीही फरक पडत नाही त्या कागदाच्या तुकड्याने आणि त्यावर असलेल्या मोठ्या किंवा कमी आकड्याने. जीवन शाळेतल्या चार भिंतींपेक्षा खूप मोठे आणि संधींनी भरलेले आहे फक्त त्या तुम्हाला घेता यायला हव्या आणि त्यासाठी शाळेच्या चार भिंतींची विद्वत्ता खरोखर खूप काही कामी येत नाही. त्या कागदाच्या तुकड्याचा उपयोग फक्त कुणाला कमी लेखण्याकरिता आणि स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याकरता दांभिक समाज करतो. आज जे ही सक्सेस लोक आहेत ज्यांनी जीवनात मोठे ध्येय साध्य केले आहे ते सर्व कमी शिकलेले कमी मार्क पडलेले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट  समाजाने कमी लेखलेले आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts