सन्माननीय वैशाली माने मॅम,
आपण विभागातील वादग्रस्त मुद्द्यांवर जे धाडसी, परखड आणि प्रामाणिक मत मांडले त्यासाठी धन्यवाद. परंतु येथे आपण केवळ स्त्रियांनाच स्थापत्य वागणूक मिळते हे जे सांगितले ते अर्ध सत्य आहे. माझा अनुभव थोडा पुढचा आहे. विभागात त्या प्रत्येक व्यक्तीस त्रास होतो जो प्रामाणिक असतो व वर्दिशी गद्दारी करीत नाही. जो समाजाची विभागची प्रतिमा डागाळणाऱ्या गद्दार, भ्रष्ट, लाचखोर लोकांना वेळोवेळी आडवा जातो. मग तो कोणत्याही पदावर असो. शेवटी चार भ्रष्ट एकत्र येऊन प्रामाणिक व्यक्तीला एवढा शारीरिक आणि मानसिक त्रास देतात की तो चुका करायला लागतो आणि त्याच्या प्रत्येक चुकांची नोंद हेतूत ठेवून याचे bad record तयार केले जाते आणि त्याला एक दिवस गुन्हेगार ठरवून शिक्षा देखील दिली जाते. ही प्रोसेस इतकी थंड काळाने आणि छद्मीपणे चालते ना त्या प्रामाणिक माणसाला लक्षातच येत नाही की त्याच्या पाठीमागे काय शिजते आहे. अशाप्रकारे पुढे तो ऍडजेस्ट करून घेतो, नैराश्यात जातो वा व्यसनी होतो काही वेळेला स्वतःला संपवतो काही वेळेला त्या गलिच्छ लोकांच्या गटारीतून स्वतःला बाहेर काढतो आणि एक पवित्र विभाग एका प्रामाणिक माणसाला मुकतो.
2003 ला नाशिक ग्रामीण पोलीसमध्ये एका अतिशय अहंकारी भ्रष्ट अधिकाऱ्याने केवळ त्याच्या अहंकारापोटी एका क्रीडा कोट्यातून भरती झालेल्या मुलाची अर्थात पोलिस कर्मचाऱ्याची प्राथमिक चौकशी लावली कारण ऐकून आपल्याला एकतर हसू येईल अथवा संताप होईल की, असे ही होऊ शकते चौकशीचे कारण होते संबंधित पोलीस खेळाडूंने एका राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक मिळवलेली होती परंतु ती स्पर्धा खेळताना त्याने विभागाची परमिशन घेतलेली नव्हती. हाच कच्चा दुवा पकडून त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याची इन्क्वायरी केली. कारण वैयक्तिक राग आणि याचा रावणा एवढा अहंकार. तेव्हा त्याचा अहंकार क्षमला जेव्हा या खेळाडूने त्याच्या युनिटसाठी पुन्हा स्पर्धेत मेडल जिंकले व या अहंकारी अधिकाऱ्याच्या मुलांना स्विमिंग शिकवले. तेव्हा कुठे त्याने या कर्मचाऱ्याला माफ केले आणि तो दुर्दैवी कर्मचारी मी होतो. परंतु माझ्या दृष्टिकोनातून ते चांगलेच झाले असे गलिच्छ लोकांचे वाईट अनुभव मिळाले तेव्हाच मी ठरवले फार काळ खात्यात रहायचे नाही त्यासाठी आर्थिक तजबीज आधीच करून ठेवायची. जी मी केली आणि आज एका वृत्तपत्राचा संपादक आहे. अर्थात कुणाचाही गुलाम नाही निदान भ्रष्ट अधिकाऱ्यांचा तरी.. म्हणून आपल्याला एकच निवेदन पोलीस विभागात जेंडर जेवढं पाहिल जात नाही तेवढं प्रामाणिक आणि अप्रामाणिकपणा पाहिला जातो आणि शिस्तीत असलेल्या प्रामाणिक लोकांनाच शिक्षा होते.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक: The Sapiens News तथा RTI ACTIVIST
X police person




