पेपर लीक होतात कारण ते विकत घेतले जातात. हा सगळा खेळ मागणी आणि पुरवठ्याचा आहे मागणी अधिक असेल तर पुरवठा करणाऱ्याला डिमांड येते. पेपर विकत घेणारे कोण असतात अर्थातच पालक ज्यांना मुलांना शॉर्टकटने पुढे न्यायचं असतं. आता पालक म्हणजे आई-वडील आणि अवघा समाज. पेपर लीक होतात मुलं आत्महत्या करतात, जखमी होतात एवढा मोठा राजकीय उलथापालथीचा खेळ होतो. ज्यात केवळ तरुणच मारले जातात शरीराने मनाने आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आहे ही समाज व्यवस्था विशेषता पालकवर्ग यांनी जी जीव घेणी व्यवस्था तयार केली.तिच्यातच मोठा दोष आहे. या व्यवस्थेत पास होणाऱ्याला जेवढं महत्त्व दिलं जातं त्यापेक्षा कितीतरी अधिक अपमानजनक वागणूक ही नापास होणाऱ्याला दिली जाते. एवढी की तो स्वतःचे जीवन देखील संपवण्यास तयार होतो. एवढी गलिच्छ वागणूक त्या गोजिरवाण्या निरागस मुलांना मिळते. एक सांगू या समाजात नापास गोळ्यांना इंच भर देखील जागा नाही त्यांना स्लेव्हज किंवा मृत होणे हेच नशीब असतं. कधी कधी तर आत्महत्या करणे अधिक चांगल वाटतं कारण ढ मुलांना ज्या यातना टोमणे दिले जातात ती मरण्यापेक्षाही अधिक जिवंतपणी मारणारी असतात. जे मी स्वतः सोसल आहे. याला एकच उपाय मुलांनी निर्लज्ज व्हावं. अशा टोमण्यांपासून जे त्यांना मरणाचा विचार करायला भाग पाडते. एकदा होऊन पहा जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि या 3C शिक्षण संस्थांच्या कागदांच्या तुकड्याचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. यांनी मला सात वेळा नापास केले. अगदी दहावीत मराठीत देखील नापास झालो आणि आज एका वृत्तपत्राचा मालक आणि संपादक आहे. मुलांना एकच विनंती कशातही खचू नका आणि आई बापाला देखील एक विनंती संयमाने घ्या तुमची मुलं एक दिवस बाप माणूस होती, आमच्यासारखी.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण, दि सेपिअन्स न्यूज




