काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसापूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबरला एका सभेत मोदी का बाप भी जायेगा हे अतिशय घृणास्पत स्टेटमेंट दिलं. तेही स्टेजवर लोकांसमोर माईकवर यात काही विशेष नाही मोदींना प्रेम करणारे जेवढे आहे तेवढे काही शिव्या देणारे आहेत आणि त्याची मोदींना सवय देखील झाली आहे. परंतु येथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे मोदी एक अशी पर्सनॅलिटी आहे जे फेकलेल्या दगडतुन ही स्वतःचे घर नाही तर महाल बांधतात आणि त्याचाच प्रत्यय आता पुन्हा येतो आहे. आज तारीख 27 आहे खरगेनी स्टेटमेंट केलं 25 तारखेला आणि सोशल मीडिया वरती मोदींच्या समर्थनार्थ वेगवेगळे संगीतमय गाणी ज्याला आपण रॅप सॉंग म्हणूया असे गाजू लागले. आता सर्व सोशल मीडिया मोदी समर्थमय झाला आहे. मी असं म्हणत नाही की मोदींवर खूप खूप लोक प्रेम करतात मी येथे हे नमूद करू इच्छितो नक्कीच मोदींवर प्रेम करण्याची संख्या मोठी जरी असली तरी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं काम अतिशय प्रभावीपणे समाजात जर कुणी करत असेल तर भाजपाची आणि मोदींची पीआर टीम. मला इथे एक स्टेटमेंट द्यावसं वाटतं आजवरच्या कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा मोदींची पीआर टीम सर्वाधिक स्ट्रॉंग आहे आणि ते ज्या पद्धतीने काम करतात त्यांना मनापासून THE SAPIENS NEWS चा सॅल्यूट. कारण जगात फुलांपासून हार तयार करणारे सर्वच आहेत परंतु काट्यांना बरोबर घेऊन किंवा काट्यांचा देखील हार तयार करून तो विरोधकांच्या गळ्यात टाकण्याचं काम हे मोदीची टीम करते आहे.





