The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

लाचखोरीच्या आरोपा नंतर अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व लिपिक शेखर देशपांडे फरार

महापालिका आयुक्त फरार
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी आणि त्यांचे स्वयंसहाय्य / लिपिक शेखर देशपांडे यांनी एका बांधकाम व्यवसायाकडे नऊ लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने औरंगाबाद येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रुचला होता. मात्र, याची कुणकुण लागल्यानंतर आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्यासह स्वयंसहाय्यक दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी एसीबीने अहमदनगर महानगरपालिकेतील आयुक्तांचे दालन सील केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.